
कुपवाड, ता.५ : विना परवाना अवैधरित्या गावठी हातभट्टी दारू विकणाऱ्यावर कुपवाड पोलिसांची कारवाई. सोमवारी (ता.४) रोजी रात्री आठ दहाच्या सुमारास शहालुल्ला नगर येथील कृष्णमूर्तीचे पाठीमागे शेडचे आडोशाला १० ते १५ लोक दारू पीत असून सदर ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री चालू असलेची माहिती फोनद्वारे कुपवाड पोलिस ठाण्याचे पोलिस मधुकर सरगर यांना मिळाली. मिळालेल्या माहितीने दिलेल्या ठिकाणी गाठून माहितीप्रमाणे प्रवीण भोला गोडावत वय ३६ वर्षे, राहणार अल्फोंसा स्कूल समोर, कुपवाड रस्ता, मिरज, सध्या राहणार शहालुल्ला नगर, कुपवाड , तालुका मिरज अवैधरित्या विना परवाना गावठी हातभट्टी दारू विकत असल्याचे दिसून आल्याने त्याच्यावर कारवाई करून त्याच्याकडील पाच लिटर प्लास्टिक पिशवीतील पाचशे रुपये किंमतीची दारू जप्त केली. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ड) प्रमाणे संशयित प्रवीण भोला याचावर गुन्हा नोंद करण्यात आला. यापुढील अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.