खटाव तालुका मिरज येथील चौकशी अहवालामध्ये दोष असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करा – परशुराम बनसोडे

मिरज, ता.४ : खटाव तालुका मिरज येथील चौकशी अहवालामध्ये दोष असणाऱ्या ग्रामविकास अधिकारी संजय कुमार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिवसेना बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष परशुराम बनसोडे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गेल्या एक महिन्यापासून गटविकास अधिकारी मिरज पंचायत समिती यांच्याकडून चौकशी अहवाल जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे कारवाईसाठी आले आहे . आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली असता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आले. त्यामुळे परशुराम बनसोडे यांनी त्यांच्या दालनासमोर पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी जिल्हा परिषद प्रशासनाचा विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. कोणत्याही दबावला बळी न पडता जिल्हा परिषद प्रशासनाने ठामपणे कारवाई करावी. अन्यथा येत्या पंधरा तारखेला मुंबई मंत्रालयात आत्मदहन करण्याच्या इशारा दिला.
याप्रकरणी शिवसेना सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ चंडाळे यांनी ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा शिवसैनिक स्टाईलने उत्तर देणार असल्याचे इशारा दिला.
चौकशी अहवालामध्ये दोषी आढळणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांच्यावर तत्काळ निलंबनाचे कारवाई करावी अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
यावेळी बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद यमगर, अण्णासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष कर्मचारी संघटना उपजिल्हाप्रमुख हरिदास लेंगरे, हनुमंत कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.