
मालगांव, ता.४ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीण बाबतीत PETA या संस्थेने चुकीचा अहवाल सादर केल्याने माधुरी हत्तीण ला गुजरात येथील वनतारा येथे नेण्यात आले आहे. गेल्या ३५ वर्षापासून नांदणी मठ येते माधुरी हत्तीण वास्तव्यास आहे. सांगली कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील सर्व स्तरातील सर्व लोकांचे माधुरीशी भावनिक नाते जोडले गेलेले आहे. तिची या ठिकाणी योग्य प्रकारे काळजी घेतली जात होती. माधुरी शी फक्त धार्मिकच नव्हे तर भावनिक नातेही अतिशय मजबूतरित्या जोडले गेलेले आहे. असे असताना सुद्धा पेटा या संस्थेकडून माधुरीच्या प्रकृतीबाबत चुकीचा अहवाल सादर केला गेला. त्या अनुषंगाने माधुरी साठी इथली व्यवस्था अनुकूल नसल्याचे कारण देत कोर्टाने माधुरीला गुजरात येथील वनतारा येथे पाठविण्याचा आदेश दिला. या कृतीच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्राने आवाज उठविलेला आहे. ठिकठिकाणी रिलायन्स उत्पादनावरती बहिष्कार टाकणे, मूक मोर्चा काढणे या पद्धतीने या घटनेचा निषेध करीत माधुरीला परत आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत.
यासाठीच आज मालगांव (ता.मिरज जि.सांगली) येथील सर्व धर्मीय ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात सर्व जाती-धर्मातील लोकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून पेटा संस्था आणि सरकार विषयी निषेध व्यक्त केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे मा.श्री.काकासाहेब धामणे (मिरज मतदारसंघ विधानसभा निवडणूक प्रमुख), श्री.शशिकांत कनवाडे, श्री अरुण राजमाने, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे सेक्रेटरी श्री अजितकुमार भंडे, श्री.विश्वास बापू खांडेकर, श्री.विजय आवटी, श्री.संजय काटे (सांगली जिल्हा शिवसेनाप्रमुख) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मालगाव ग्रामपंचायतचे डेप्युटी सरपंच श्री तुषार खांडेकर,श्री कपिल कबाडगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्री प्रदीप सावंत, श्री संजय खोलकुंबे, श्री सुरेश वसगडे, किरण चौगुले, वीर सेवा दल, महिला मंडळ, चंदाबाबा सायकल ग्रुप तसेच सर्व गणेश मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.