
कुपवाड, ता.३: येथील चाणक्य चौक रोडवर शनिवार (ता.२) रोजी सायंकाळी ६ :१० च्या सुमारास गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या दोघांना कुपवाड पोलिसांनी गाठून कारवाई केली. दोघां संशयिताला ताब्यात घेतले. नयन वजीर तलवार, वय २४ वर्ष, रा. मुजावर प्लॉट, सांगली सध्या रा गंगानगर १ ली गल्ली सांगली, सुदर्शन सुनील यादव, वय २३ वर्ष, मूळ राहणार फॉरेस्ट ऑफिस जवळ, भोसे तालुका मिरज सध्या रा. सेंट्रल हायस्कूल मागे वारणाली, सांगली असे ताब्यात घेतलेल्या दोघां संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन कोयते हस्तगत करण्यात आले आहे.
दोघां संशितावर कुपवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रवीण ईश्वरा मोहिते (कुपवाड पोलिस) यांनी फिर्याद दिली. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ 2613 गोरे हे करीत आहे.