
वड्डी, ता.३: सांगली जिल्ह्यातील वडी गावचे सामाजिक कार्यकर्ते महेंद्र नाईक नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. संजय गांधी निराधार पेन्शन योजना, श्रावण बाळ पेन्शन योजना तालुक्यामध्ये अनेक निराधार महिला व अपंग व्यक्तींना त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन शासनाकडून पेन्शन मंजूर व विविध योजनांचा लाभ त्यांनी गरजूंना मिळवून दिला आहे. त्यांनी केलेल्या या कामाची व कार्याची दखल घेऊन जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांनी महेंद्र नाईक यांची निवड केली आहे. या निवडीने संघटनेचे काम सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढेल. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यासाठी महेंद्र नाईक यांची निवड करण्यात आली आहे. समाजातील गोरगरीब लोकांसाठी व त्यांच्या हक्कासाठी संघटनेमार्फत व संघटना वाढीसाठी पुढच्या काळात काम करणार असल्याचे महेंद्र नाईक यांनी सांगितले आहे.