
कुपवाड, ता.२: औधोगिक वसाहतीत दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत विश्वनाथ शंकर पाटील, वय ५३ वर्ष रा. नम्रता कॉलनी, वार्ड क्रं २, बुधगाव यांनी कुपवाड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सोमवारी (ता.२८) रोजी विश्वनाथ पाटील यांनी आपली दुचाकी सूर्या इंडिस्ट्रीज येथील पार्किंगच्या ठिकाणी लावली होती. पार्किंगच्या ठिकाणावरून सोमवारी (ता.२८) रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळीं सव्वासहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर (दुचाकी क्रं MH 09 BW 1693 ) ही दुचाकी लंपास केली. याबाबत विश्वनाथ पाटील यांनी दुचाकी चोरीची तक्रार कुपवाड पोलिसात केली. तक्रारीवरून अज्ञात चोरावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.