
कुपवाड, ता.३: औद्योगीक वसाहतमधील कारखान्यातील शेडमधील वर्कशॉप जवळ ठेवलेले ५० किलो वजनाचा ३०,००० रु, किंमतीचा कॉपर वायर बंडल अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली. सदर घटना २८ जुलैच्या रात्री ३० जुलैच्या सकाळी ८ च्या दरम्यान ओवी इंटरप्रायेस कंपनीचे बोळात येऊन कंपनीचे भिंतीवरून आत प्रवेश करून कंपनीचे शेड मध्ये वर्क शॉप जवळ ठेवलेले कॉपर वायर चे बंडल अज्ञात चोरट्याने लंपास केले.
याबाबत विशाल नेताजी पवार वय ३३ वर्षे, व्यवसाय- मॅनेंजर, रा.सोनी, तालुका मिरज यांनी फिर्याद कुपवाड पोलिसात दिली. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.