
कुपवाड, ता.३ : कुपवाडात बाप लेकाला अडवून अज्ञात्यांकडून मोबाईल चोरी. गुरुवारी (ता.३१) रोजी बाप लेक दोघे कामावरून सुट्टी करून सायकलने घरी जात असताना दोघा बाप-लेकाला लट्टे कॉलेज जवळ गुरुवार ( ता.३१) रोजी रात्री सेव्वा एकच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी अडवले त्यांना चाकू व लोखंडी सळीचा धाक दाखवत धमकावले व त्यांच्याकडील खिशात जे काय आहे ते काढून देण्यास सांगितले. तर त्यातील दोघांनी बळजबरीने फिर्यादी मोहम्मदगौस व त्याचा मुलगा नदीम यांचे खिशातील ७०००/- रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा redmi 9 A मॉडेलचा स्मार्टफोन काढून घेतला. चार इसमांनी तेथून पळ काडला.
याबाबत मोहम्मदगौस गुलमोहम्मद मोमीन वय ५९ वर्षे, व्यवसाय- व्यापार धंदा मजुरी टेलरिंग रा. शाही दरबार हॉल जवळ टाकळी रोड मिरज तालुका मिरज यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली असून चौघां अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढील अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.