
कुपवाड, ता.३ : बंद घरात चोरी; दागिन्यांसह १ लाख ३० हजारांचा मुद्देमाल अज्ञात्यांनी लंपास केला. कुपवाड येथील पोलिस कॉलनी, पालवी हॉटेलचा मागे गुरुवार ३१ जुलै सायंकाळी सहा ते शुक्रवार १ ऑगस्ट रोजी सकाळी सातच्या दरम्यान फिर्यादी यांचे राहत्या घराचे बंद दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिन्यासंह रोख रक्कम आणि त्यासोबत माळ्यावरील बेडरूम मध्ये ठेवलेला लॅपटॉप असा एकूण १३,७०००/ रुपयाचा मुद्देमाल लबाडीने फिर्यादीचे संमतीशिवाय चोरून नेला.
चोरीस गेलेला मुद्देमाल….
७५,०००/- रुपये किमतीचा १५ ग्राम वजनाची सोन्याची चेन, २५,०००/ किमतीची सोन्याची चेन, २०,०००/ किमतीची ३ जोड चांदीचे पैजण एकूण २० ग्रॅम वजनाचे, १५,०००/ किमतीचा dell कंपनीचा laptop त्याचा मॉडेल न VOSTRO1540 आणि २००० रोक रक्कम असा एकूण १ लाख ३०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतसागर मच्छिंद्र नाईकवाडे वय ३५ वर्षे ,व्यवसाय- नोकरी, राहणार प्लॉट न २९ पोलिस कॉलनी पालवी हॉटेल पाठीमागे कुपवाड तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे.अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.