
कुपवाड, ता.३: औद्योगिक वसाहत मिरज येथील कारखान्यात वीस हजार चारशेबत्तीस रुपयांचे मटेरियल चोरीस गेल्याची घटना घडली. मिरज वसाहत मधील फाईन असोसिएट्स अँड इंजिनियर्स प्रा लिमिटेड कंपनी या कारखान्यात २९ जुलैच्या रात्री आकरा वाजल्यापासून ते ३१ जुलैच्या सकाळी साडे नऊच्या सुमारास कंपनीमधील सी ४५/२ मधील स्टोअर रूमच्या बाहेर मोकळ्या जागेवर ठेवलेला माल (मटेरियल) यामध्ये १)१२२३४/-१०५-६०० मिमि लांबीची एक स्टील बार अंदाजे किंमत २)२४४६/१०५-१२० मिमी लांबीची एक स्टील बार किंमत अंदाजे. ३)१४२८/-१०५-७० मिमी लांबीची एक स्टील बार किंमत अंदाजे. ४)१८७६/-१३०-६० मिमी लांबीची एक स्टील बार जुनी किंमत अंदाजे. ५)२४४८/-५०-१३०-१६० मिमी लांबीची ०१ फ्लटस्टील बार बार किंमत अंदाजे. असा एकूण २० हजार ४३२ रु. किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला. सदर घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झालेली आहे. विशाल नाना कदम वय ३९ वर्षे धंदा खाजगी नोकरी (फाईन स्पे व्ही असोसिएट्स अँड इंजिनियर्स प्रा लिमिटेड ) रा. पंढरपूर रोड मिरज मिरज तालुका मिरज यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.