
कुपवाड, ता.३ : चाणक्य चौकात चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या संशयितास कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे, वय २७ वर्ष, रा. देशिंग, सध्या रा. इंदिरानगर, १ ली गल्ली, जयभीम कट्ट्याजवळ, सांगली असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. शनिवार (ता.२) रोजी रात्री नऊ वाजनेचा सुमारास चाणक्य चौकात चोरीच्या उद्देशाने झाडाच्या आडोशात अंधारचा फायदा घेऊन दबा धरून लपून बसलेला संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अविनाश पाटील (कुपवाड पोलिस) यांनी फिर्याद दिली. यापुढील अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहे.