
कुपवाड, ता.२७ : येथील श्यामनगरमध्ये सात हजार चारशे पासष्ट रु. किमतीचा देशी दारू साठा कुपवाड पोलिसांनी जप्त केला. याबाबत कविता सचिन नगरकर वय 38 वर्षे राहणार शामनगर कुपवाड तालुका – मिरज, जिल्हा सांगली यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ड), 65 (इ) प्रमाणे कुपवाड पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला. याबाबत फिर्यादी-प्रवीण ईश्वरा मोहिते कुपवाड पोलीस यांनी दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड, श्यामनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशास विना परवाना बेकायदेशीर पणे दारू साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याने कुपवाड पोलिसांनी छापा कारवाई केली.
- ———–या कारवाईत————
- 1)1760/- किमतीची मॅकडॉल नंबर एक विस्की कंपनीच्या 180 एम एल
- 2)1855/-किमतीचे देशी दारू थ्री एक्स कंपनीच्या 90 मिलीच्या 53 सीलबंद बाटल्या
- 3)1050/-किमतीची देशी दारू टॅंगो पंच कंपनीच्या 90 मिलीच्या 30 सीलबंद बाटल्या
- 4)2800/-किमतीची गावठी हातभट्टीची दारू 28 लिटर 100/-रुपये लिटर
- असा एकूण-7465/-रुपये किमतीचा दारू साठा कुपवाड पोलिसांनी जप्त केला.
याबाबत कल्पना नगरकर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ( ड), 65 (इ ) प्रमाणे कुपवाड पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.