
कुपवाड , ता. २७ : एका महिला उधोजकाची १९ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली. फसवणूक झाल्याने महिलेने तात्काळ पोलीस स्टेशन घाटत व्यापाऱ्याविरोधात कुपवाड पोलीसांत तक्रार दाखल केली. सागर नारायणदास केसवाणी (वय ३५ रा. उल्हासनगर,जि.ठाणे) असे तक्रार दाखल करण्यात आलेल्या संशयित व्यापाराचे नाव आहे. याबाबत संजय इंडिस्ट्रीयल माधवनगर ईस्टेटमधील इंडोटेक्स एक्सपोर्ट कंपनीच्या संचालिका ममता राजेंद्रकुमार बाफना (वय ५२ वर्ष, व्यवसाय-व्यापार, रा. २४२, मंगळवार पेठ, माधवनगर) कुपवाड पोलीसांत यांनी फिर्याद दिली .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजिका ममता बाफना यांची संजय इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये इंडोटेक्स एक्सपोर्ट नावाने जीन कापड निर्मितीचा कारखाना आहे. तर संशयित केसवणी यांची (जि.ठाणे उल्हासनगर) येथे चिराग ॲप्रेल्स नावाने कंपनी आहे. केसवाणी यांनी बाफना यांचा विश्वास संपादन करून २७ जानेवारी ते ११ एप्रिल २०२३ या कालावधीत बाफना यांच्या कंपनीसोबत करार करून तयार जीन कापडाची ऑर्डर देऊन सदरचा माल इंडोटेक्स कंपनी माधवनगरातून ठाणे उल्हासनगर येथे नेला.
संशयित सागर केसवाणी यांनी खरेदी केलेल्या जीन कापडाच्या बिलाची एकूण रक्कम २७ लाख २९ हजार ८६२ रुपये इतकी झाली होती. सदर बिलाच्या रक्कमेपैकी केसवाणी यांनी फक्त ७ लाख ६५ हजार ४६१ एवढी रक्कम ममता बाफना यांना दिली. ऑर्डर दिलेल्या जीन कापडाचा माल घेऊन गेले. ऑर्डरी मधील उर्वरीत मालाच्या बिलाची रक्कम १९ लाख ६४ हजार ४०१ रुपयांची बाफना यांनी संशयित केसवाणी यांच्याकडे मागणी केली असता, केसवाणी यांनी रक्कम देण्यास सतत टाळाटाळ केली.
सतत टाळाटाळ केल्याने बाफना यांना लक्षात आले की आपली फसवणूक झालेली आहे. झालेल्या फसवणूकीमुळे उद्योजिका ममता बाफना ने थेट पोलीस स्टेशन घाटले. व्यापारी सागर केसवाणी यांच्या विरोधात कुपवाड पोलिसात फसवणूकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयित केसवाणी याच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून यापुढील अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.