
कुपवाड, ता.२३:रामकृष्णनगर येथे एका बत्तीस वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आलेची घटना आज सकाळी उघडकीस आली. अमोल सुरेश रायते (वय ३२ वर्ष, व्यवसाय- सेंट्रींग काम, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) असे मृताचे नाव आहे. घटना समजताच आयुष्य हेल्पलाईन टीम व कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी करून मृतदेह शेवविच्छेदनास पाठविण्यात आले. खून करून हल्लेखोर पसार झाले आहेत. घटनेची नोंद कुपवाड पोलीसांत झाली असून संशयित आरोपीचा शोधासाठी पथके रवाना झाले आहेत.

पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार अमोल रायते हा तरुण सेंट्रींग कामे करतो. अमोलवर कालमध्यरात्री रामकृष्णनगर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खुन करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शेवविच्छेनासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळाची पाहणी करून उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी संशयित आरोपीचा शोधासाठी पथके रवाना केले असल्याचे सांगितले. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली.
घटनास्थळी धाव
घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मिजर उप अधीक्षक प्रणील गिल्डा, स्थानिक गुन्हेचे सतीश शिंदे, सांगली ग्रामीणचे रणजित तिप्पे, मिरज शहरचे किरण रासकर, महात्मा गांधींचे संदीप शिंदे आदीने धाव घेतली.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे करीत आहेत.
