
आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नियोजनातून बुधगाव भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून रक्तदान शिबीराचे आयोजन

सांगली, ता.२२ : बुधगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नियोजनातून आज मंगळवार (ता.२०) रोजी बुधगावतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने महादेव मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आयोजित शिबिरास गावातील रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
प्रमुख उपस्थिती
आमदार सुधीर दादा गाडगीळ, बुधगांव गावचे सरपंच सौ वैशाली विक्रम पाटील, शुभांगी कोळी, भाजपचे ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसभापती, पंचायत समिती मिरज विक्रम भाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, विनायक शिंदे, सयाजीराजे कदम, जिल्हाअध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, जयवंत पाटील, मंदार भाकरे आदी उपस्थित होते.