

मंत्री मुश्रीफ, आ. नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती

राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांचा उपक्रम
मिरज, ता.२२ : महाराष्ट्र राज्याच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आवारात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य आ. इद्रिस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे व कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने, शहर जिल्हाकार्याध्यक्ष जमील बागवान, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष देवजी साळुंखे, शकंर बापू गायकवाड, युवक राष्ट्रवादीचे राजू शेख, चंद्रकांत मैगुरे, ईश्वर जनवाडे, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा राधिका हारगे, वंदना चंदनशिवे, जुबेदा मुजावर, शीतल सोनवने, नीता आवटी, बोलवाडच्या सरपंच निगार शेख, टाकळी सरपंच हिना नदाफ, सुलेमान मुजावर, मनोज नांद्रेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना महादेवदादा दबडे म्हणाले की, राज्यातील जनतेसाठी घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे आमचे नेते अजितदादा पवार हे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री ठरले आहेत. अशा आमच्या नेत्यांचा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे पक्षाचे ध्येयधोरण आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला असल्याचे महादेवदादा दबडे यांनी सांगितले.