
जत, ता. २०: येथे पतीने पत्नी व प्रियकरावर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर घटना शनिवारी (ता.१९) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. सदर घटना ही अनैतिक संबंधातून घटना घडलेली आहे. जत येथील क्रीडा संकुल येथे पत्नी व प्रियकर सत्यजित ईश्वर संकपाळ (वय २५, कणसेवाडा, जत) यांच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. याबाबत संशयित संजय जाधव (शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरोधात जत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद जखमी पत्नीने पोलिसात दिली आहे.
पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार प्रियकर सत्यजित संकपाळ याचे एका विवाहित महिलेशी एकावर्षांपूर्वी सोशियल मीडियाद्वारे ओळख होऊन प्रेम संबंध जुळले. यातून तो अधून-मधून तिच्या भेटीसाठी तो पुण्यास भेटण्यास जात होता. यातून त्याने त्या महिलेस अडीच महिन्यांपूर्वी जत येथिल दुधाळ वस्तीत भाड्याच्या खोलीत आणून ठेवले. या कारणातून पती संजय व प्रियकर यांच्यात सारखे खटके उडायचे. शनिवारी तो अचानकपणे संजय हा सत्यजित व पत्नी यांच्या घरी आला. संजय घरी आल्याने पत्नी व संजय यांच्यात वाद झाला. सदर वाद मिटवण्यासाठी शहरातील क्रीडा संकुल येथे गेले असता सत्यजित व संजय या दोघात शिवीगाळ होत वाद सुरू झाला वादाचे रूपांतर मारामारीत झाले. रागाच्या भरात संजयने कोयत्याने सत्यजितच्या मानेवर, दांडावर व पायावर गंभीर वार केले. सत्यजितला वाचविण्यास गेलेल्या पत्नीला संजयने हातावर वार केला. या घटनेनंतर संजयने पळ काढला.
सदर घटना शनिवार (ता.१९) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घडली. प्रथमोपचार उपचार करून सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिलेने जत पोलिसात फिर्याद दिली आहे. यापुढील अधिक तपास पोलिस करीत आहेत