
सांगली, ता.२० : अंकली येथे सांऊ एकल महिला समिती व डॉ.आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेमार्फत येथील मुलींना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. शबाना शेख आणि साऊ एकल महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अंकली येथे विधवा महिलांच्या मुलींना शैक्षणिक साहित्य मोफत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
या उपक्रमात विविध शाळांमधील गरजु विद्यार्थिनींना वह्या, लेखन साहित्य, छत्री, टिफिन बॉक्स कंपोस बॉक्स पॅड व इतरशालेय साहित्य वितरण करण्यात आले एकल महिलांच्या २७ विद्यार्थ्यांना या योजनाचा लाभ घेतला. त्या प्रसंगी या महिलांनी व विद्यार्थ्यांनी संस्थेचा आभार मानले. शबाना शेख यांनी यावेळी बोलताना महिलांसाठी पुनर्विहाचे महत्त्व आधोलिरेखित केले.
महिलांनी स्वतःच्या व मुलाच्या भविष्याचा विचार करून समाजाच्या बंधनापलीकडे जाऊन पुनर्विवाहाचा विचार करावा संस्था यांच्या पाठीशी उभी आहे. शिक्षणाचे महत्त्व सांगितले की शिक्षण हे मुलाचे भविष्य घडवते संस्थेने आतापर्यंत अनेक गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन पुरवले आहे. गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना तिथून पुढेही शैक्षणिक साहित्य पुरवणार आहोत असे त्यांनी सांगितले.
मोलाचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामीण पोलीस स्टेशन सांगलीचे पदाधिकारी रामदास बांगडे साहेबांनी शिक्षणाचे महत्त्व मोबाईल मुळे होणारे दुष्परिणाम या वरती पालक व विद्यार्थी यांना माहिती दिली व आई मुलांमध्ये मैत्रीपूर्ण नातं असावं मुलांनी टीव्ही मोबाईल वरती काय बघावं किती वेळ बघावं याच्याकडे पालकांचे लक्ष असणे गरजेचे आहे गेली १४ ते १५ वर्ष ते समाजातील विधवा येथील महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच या महिलांच्या मुलांच्या शिक्षणिक मदत करण्यासाठी ही संस्था कार्यरत आलेली आहे. महिला व मुलींच्या समोर मत मांडले संस्थेविषयी सरांनी कौतुक केले. गेले १४- १५ वर्ष ते समाजातील विधवा एकल महिलांच्या संरक्षणासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच या महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदत करण्यासाठी हे संस्था कार्यरत आहे.
या कार्यक्रमास रामदास बांगडे, अंकली ग्रामपंचायत पदाधिकारी ऋतुजा सुतार अंकली गावचे पोलीस पाटील शिल्पा घोलप आणि पदाधिकारी उपस्थित होते