
सांगली, ता. १९: २३ जुलैला शहराला अपुरा पाणी पुरवठा होणार असल्याचे पुरवठा अधिकारी यांनी सांगितले आहे. पाणी पुरवठा सुधारणा व सुररीत करण्याकामी दुरुस्तीसाठी नदीतून पाणी उपसा बंद करण्यात येणार आहे. यामुळे शहरास पाणी पुरवठा अपुरा होणार आहे. शहरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, महानगरपालिका सांगली पाणी पुरवठा योजना अंतर्गत जॅकवेल उपसा केंद्र येथे महावितरण कंपनी कडील RMU (रिंग मेन युनिट) शिफ्टिंग करून विद्युत जोडणीने चार्ज करणे अनुषंगिक काम आणि पाणी पुरवठा सुधारणा करणेच्या कामांचे मोठ्या स्वरूपाच्या क्रॉस कनेक्शन्स करणेची महत्वाची कामे पाणी उपसा बंद ठेवुन पुर्व तयारीनिशी मंगळवार ( ता.२२) रोजी सकाळ पासून हाती घेणेत येणार आहेत.
मोठ्या स्वरूपाची काम असल्याने ती टेस्टिंगसह पुर्ण करणेस वेळ लागण्याची शक्यता आहे. यामुळे बुधवार (ता.२३) रोजी सर्व भागात अपुरा पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती श्री.चिदानंद कुरणे, कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा यांनी दिली आहे. नागरिकांना सूचित करण्यात आले आहे की, मंगळवार सकाळ सत्रमध्ये मिळणारे पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करण्याचे सांगण्यात आले आहे.