
कुपवाड, ता.१९ : औधोगिक वसाहतमधील नव कृष्णा व्हॅली स्कुल या शाळेतीळ विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन मिरज पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्डा, सपोनी सुनील गिड्डे, वाहतूक शाखा, मिरज विभाग आणि पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी, निर्भया पथक, मिरज विभाग आणि कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर यांच्याकडून करण्यात आले.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन केले. डीएडेक्शन, डायल वन वन टू (११२) एखादा अवचित प्रकार घडत असेल किंवा अपत्कालीन वेळेस (११२) नंबर डायल केल्यास आपणाला काही वेळातच मदत मिळते.

निर्भया पथक यांनी विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श (Bad touch – Good Touch ) याबाबत सविस्तर माहिती दिली. वाहतूक नियमांवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नव कृष्णा व्हॅलीचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
