
नांगोळे, ता.१९ : सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील नांगोळे गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकाच कुटूंबातील चौघांना विषबाधा झालेची घटना घडली आहे. यामध्ये सासू- सूनेचा संशयास्पद मृत्यू झाला. बाप-लेक या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील व सून काजल समीर पाटील या दोघींचा मृत्यू झाला आहे. बाप अल्लाउद्दीन पाटिल आणि लेक समीर पाटील या दोघां बाप-लेकाची प्रकृती गंभीर आहे. सदर घटना आज शुक्रवार (ता.१८) सकाळी घडली आहे. घटना समजताच कवठेमहांकाळ पोलिसांनी धाव घेतली. घटनेची नोंद पोलीसांत झाली आहे. घटनेचे अद्याप कारण स्पस्ट नसून सदर घटनेत घातपात झाले की, आत्महत्या ? याबाबत चर्चेला उधाण येत आहे. या पुढील अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहे.