
कुपवाड
, ता. १८ : आगामी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कुपवाड पोलीस ठाणे, सांगली अंतर्गत गाव भेटी करण्याचे योजले. त्या अनुषंगाने आज सावळी गावात आगामी गणेशोत्सव निमित्त गावातील गणेश मंडळासमवेत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक भांडवलकर, पोशि/ संदिप घस्ते व सावळी गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, सरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व नागरीक उपस्थित होते.
यावेळी बैठकी दरम्यान सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी मंडळांना सूचित केले की, यावेळी गणेश मंडळांनी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करावा. या उत्सवात मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावा तसेच पर्यावरणपुरक गणेश उत्सव साजरा करण्याचे सांगितले आहे. गणेश मुर्तीची स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत दक्षता घावी. कोणताही अवचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यावी. गणपती मिरवणुकी दरम्याने वाहतुक कोंडी होऊ नये याची काळजी घावी तसेच त्याचे व्यवस्थापन व गणपती मंडळांनी स्वयंसेवक नेमणेबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.
मंडळाचा ठराव
सावळी गावातील गणेश मंडळ व नागरिक यांनी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव करणेबाबत तसेच पर्यावरणपुरक गणेश उत्सव व सामाजिक उपक्रम राबविण्यार असल्याचे गावातील गणेश मंडळांनी ठराव केला आहे. गत वर्षाप्रमाणे विरशैव गणेश मंडळ व अमरकला गणेश मंडळ यांनी यंदाही गणेश मंडपामध्ये व गावातील मुख्य रोड आणि स्वागत कमानी वरती सीसीटीव्ही बसविणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी गावातील एकुण १५ गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य, सावळी गावचे सरपंच, ग्रामपंचयात सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष व नागरीक आदी उपस्थित होते.