
कुपवाड, ता. १४ : कुपवाडात युवकाची आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. विकास शामराव मराठे (वय ३५ वर्ष रा. श्रीमंती कॉलनी, कुपवाड ता. मिरज) असे मयताचे नाव आहे. विकासने राहत्या घरात सोमवारी दुपारच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयताचा भाऊ शिवाजी शामराव मराठे यांनी वर्दी दिली. घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विकास मराठे हे कुपवाडच्या श्रीमंत कॉलनीत वास्तव्य करत होते. सोमवारी (ता.१४) रोजी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील छताला साडीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याची माहिती मिळताच कुपवाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या आत्महत्येचे कारण अस्पस्ट असून घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.