
कुपवाड , ता.१३ : नाभिक संघटना कुपवाड यांच्यावतीने साला बादप्रमाणे नरवीर शिवा काशीद यांच्या ३६५ व्या पुण्यतिथीनिमित्त नागराज चौकात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. नरवीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या शिबिरासाठी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये शंभरपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यानिमित्त रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी कुपवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर, माजी नगरसेवक गजानन मगदूम, प्रकाश ढंग, सचिन ढोने, प्रल्हाद कबुरे, संदीप सपकाळ, दत्ता कदम, सागर गायकवाड अमोल साळुंखे, सचिन काळे,गजानन शिंदे, अमोल सपकाळ, कल्लापा कोरे, संतोष कदम,रमेश सुरवसे, महादेव कोरे, अमोल घायाळ, आकाश खंडागळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.