
तासगाव, ता.१३ : गव्हाण गावचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवार यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. गायरान अतिक्रमण धारकांची घरे गरिबांच्या नावावर झाली पाहिजेत यासाठी अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. या सर्व सामाजिक कार्याबद्दल त्यांना आज रविवार (ता.१३) रोजी कोल्हापूर येथील राजश्री शाहू महाराज स्मारक भवन येथे जिल्ह्याचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत तसेच लोकप्रिय शिक्षकतज्ञ प्राचार्य डॉ . अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते गव्हाण गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते मा. शरद संभाजी पवार यांना राज्यस्तरीय गुरुवर्य समाजरत्न पुरस्काने सन्मानित करण्यात आले. शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी गेली अनेक वर्षापासून अविरतपणे संघर्ष करीत असल्याबाबत त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन मे महिन्यात तासगाव येथे सन्मानित करण्यात आले होते.
यावेळी शेतकरी नेते भाई दिगंबर कांबळे, प्रसाद खराडे, ऋषीकेश पवार, महादेव पवार व इतर मित्र परिवार उपस्थित होता.