
कुपवाड, ता.१२ : औधोगिक वसाहतातील सुयश ऑटोमोबाईल कास्टिंग प्रा. लि या कंपनीत वीस वर्षीय मुजाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमनाथ अशोक माळी, वय २० वर्ष, रा. कवठेमहांकाळ असे आपघातात मृत झालेल्या मजुराचे नाव आहे. ही घटना समजताच घटनास्थळी कुपवाड पोलिसांनी धाव घेतली. सदर घटनेची नोंद कुपवाड पोलिसात झाली आहे. याबाबत CMO डॉ. निलेश कातार मिरज रुग्णालय यांनी दिली.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुयश ऑटोमोबाईल कास्टिंग प्रा. लि या कंपनीत सोमनाथ अशोक माळी कामास होता. आज शनिवार (ता.१२) दुपारी पावणे एकच्या सुमारास काम करत असताना कणवेर बेल्टमध्ये अडकल्याने डोक्यास गंभीर इजा होऊन डोके फुटून पडल्याने दुपारी अडीच वाजता सुरज पंडित दळवी यांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैधकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. घटनास्थळी कुपवाड पोलीस व आयुष्य हेल्पलाईन टीमने धाव घेत मृतदेह शेवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे करीत आहेत.