
सांगली
, ता.११ : आयुष हेल्पलाईन टिमने आज पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या तरुणास घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ वाचवले. आज शुक्रवारी (ता.११) रोजी सकाळी कृष्णामाई घाटावर महापालिके विरोधात सांगली शिवसेने कडून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलनकर्ते कृष्णेच्या पात्रात उभे राहून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत होते.
यावेळी एक तरुण आक्रमक होऊन पाण्यात उतरला,पण यावेळी पाणी भरपूर असल्याने पाण्याला ओढ असल्याने तो वाहत जाऊ लागला. त्याला ही पाण्याचा अंदाज आला नसल्याने वाहून जाऊ लागला. यावेळी तात्काळ आयुष हेल्पलाईन टीम सदस्य पुढे सरसावले आणि त्यांनी बोट त्या दिशेने नेऊन सुरज शेख पाण्यात उडी घेऊन त्याला तात्काळ बोट मध्ये घेऊन. त्या तरुणास पाण्याच्या बाहेर काढण्यात आयुष टिमला यश आले.
यावेळी मदतीसाठी आयुष हेल्पलाइन टीम प्रमुख अविनाश पवार सुरज शेख, नरेश पाटील, रुद्रप्रताप कारंडे अजित कांबळे, रेहान मुल्ला, निहाल बावा, आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते