
सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन
सांगली, ता. ११ : सांगली जिल्ह्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये शासकीय संस्थांच्या योजनांचा प्रचार व प्रसिध्दी तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अभिछात्र वृत्ती अशा अनेक योजनांची जाणीव व जागृतीसाठी ,सोमवार १४ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरवात ,सोमवारी( ता.१४) जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली या महाविद्यालयापासून होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, असे समाज कल्याण सांगलीचे सहायक आयुक्त मेघराज भाते यांनी कळविले आहे.