आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यास चालकांना अर्ज करण्याचे आवाहन

ऑटोरिक्षा, मीटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, ता.१० : धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑटो रिक्षा चालक व मीटर्ड टॅक्सी चालकांनी

https://ananddighekalyankarimandal.org/home/register

या वेबसाईटवर अर्ज करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.

शासन निर्णय २४ जुलै २०२४ नुसार ऑटो रिक्षा चालक व मीटर्ड टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र ऑटो-रिक्षा मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाचे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यकरणीबाबत तसेच मंडळाचे संबंधित शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत शासन निर्णयामध्ये निर्देश देण्यात आले असल्याचे म्हटले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button