
सांगली, ता.११ : मनपा शाळा क्र.३६ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवा संस्था सांगली यांचे वतीने महानगरपालिका शाळा क्रमांक ३६ सांगली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महापालिका शाळेतील गरजू व होतकरू मुलांसाठी गत वर्षाप्रमाणे यावर्षीही विवेकानंद संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी रामकृष्ण विवेकानंद आध्यात्मिक सेवाभावी संस्थेचे कौतुक केले.
संस्थेने दिलेल्या साहित्यामध्ये दिलेले लेखन व वाचन साहित्य उपयोगी पडेल व शालेय अभ्यास क्रमाबरोबर अवांतर वाचनाच्या पुस्तकाने ज्ञानात भर पडेल असे माजी नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितले. शाळेसाठी अत्यंत गरजेचे गोष्ट म्हणजे चार-पाच किलोमीटरवर अंतरावरून येणाऱ्या गरजू मुलांसाठी स्कूल बस महानगरपालिकेमार्फत मिळावी. यासाठी पाठपुरावा करणार असे अभिवचन माजी नगरसेवक विष्णू माने यांनी दिले.
गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, एच बी ओलेकर, संस्थेचे सचिव अनिल कोरे, विनायक माने, विष्णुपंत सावंत सर, भीमसेन कोळी, मुख्याध्यापक शंकर ढेरे, शाहीन सनदी, मोनाली पवार, कविता चौगुले, सुमन फडतरे आदी उपस्थित होते