
सांगली, ता.४ : आटपाडी (जि. सांगली) येथे चोरी करून चोरीचा बनाव करणाऱ्या महिलेस सांगली स्थानिक शाखेने अटक केले आहे. दिपाली पांडुरंग पुकळे, रा. पुकळे वस्ती, झरे ता. आटपाडी असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिलेकडून १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने १६ लाख ६१ हजार १०० रु. किं, मुद्देमाल जप्त केला. पोलिसांच्या तपासादरम्यान आर्थिक आडचणीतून स्वतः चोरी करून चोरीचा बनाव करत पोलीसांत खोटी फिर्याद दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपाली पुकळे यांनी आटपाडी पोलिसात चोरी झाल्याची फिर्याद १३ सप्टेंबर २०२४ रोजी दिली होती. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ सतीश शिंदे यांना आदेशीत केले. घटनास्थळावरील पुरावे व इतर माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने सहा. पोलीस निरीक्षक, सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार केले. मंगळवार (ता.१) पथकातील पोलीस उदय साळुंखे यांना बातमी मिळाली की, फिर्यादी दिपाली पुकळे यांनी फिर्याद दिलेले गुन्हे घडले नसुन स्वतः फिर्यादी हिनेच चोरीच्या गुन्हयाचा बनाव केला आहे. दिलेल्या माहितीने स्थानिक शाखेचे पथक व आटपाडी पोलीस ठाणेकडील गपोकों/२५४० जाधव फिर्यादी हिचे घरी जावुन विचारपुस केली असता आर्थिक अडचणीमुळे घरी न सांगता ओळखीच्या ठिकाणी दागिने गहाण ठेवून पैसे घेतले असल्याचे सांगितले. दोन खोट्या फिर्यादी तिने स्वतःहुन आटपाडी पोलीस ठाणेस दिले असून गुन्हयातील सोन्याचे व चांदीचे दागिने पोलीसांच्या ताब्यात दिला. खोटी फिर्याद देणारी फिर्यादी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी आटपाडी पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि/ सतीश शिंदे, सपोनि सिकंदर वर्धन, पोलीस उदय साळुंखे, संजय पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, सोमनाथ गुंडे, रणजित जाधव, सोमनाथ पतंगे, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते आदींनी केली. या पुढील अधिक तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.