जत तालुका मत्स्य शेतीसाठी पथदर्शी बनण्याच्या दिशेने एक पाऊल

जत, ता.४ : आमदार गोपीचंद पडळलर यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. जत तालुक्याला शेततळे आधारित मत्स्य शेतीसाठी “पायलट प्रोजेक्ट” (पथदर्शी प्रकल्प) म्हणून घोषित करण्यात यावे याबाबत चर्चा करण्यात आली.
या चर्चेदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतसारख्या दुष्काळी भागात पर्यायी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मत्स्य शेती हा महत्त्वपूर्ण पर्याय ठरू शकतो असे सांगितले. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा व जत तालुका देशासाठी एक मॉडेल ठरावा, हा आमचा प्रयत्न आहे असे पडळकरांनी सांगितले.
