
सांगली, ता.४ : आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची मुंबई विधानभवन येथे भेट घेतली. सांगली विधानसभा मतदारसंघातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या देवस्थानांचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र योजनेत समावेश करावा अशी मागणी केली.
यामध्ये बुधगाव मधील विठ्ठल मंदिर, सिध्देश्वर मंदिर पद्ममाळे मधील पद्मावती मंदिर, दर्गा,लक्ष्मी मंदिर बिसुरमधील श्री दत्तमंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वाजेगावमधील वाजुबाई मंदिर कर्नाळमधील श्री मारूती मंदिर बामणोलीमधील श्री भैरवनाथ देवस्थान बामणोली या तीर्थक्षेत्रांचा ‘ ब ‘ वर्ग तीर्थ क्षेत्रात करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माझे सहकारी माजी आमदार दिनकर तात्या पाटील उपस्थित होते.