
बुधगाव, ता.३ : कामाचा वादातून मित्रानेच केला मित्राचा चाकू भोसकून खून. सदर घटना गुरुवार सकाळी साडेआठच्या सुमारास बुधगाव झेंडा चौकात घडली असून सिकंदर मौला शिकलगार वय ५२ वर्ष, रा. बुधगाव यांचा खून करण्यात आला. सदर घटनेची सांगली ग्रामीण पोलीसांत नोंद झाली असून संशयित आरोपी रफिक मेहबुब पट्टेकरी वय ५९ वर्ष, रा. बुधगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शब्बीर शिकलगार यांनी फिर्याद पोलिसात दिली. संशयित आरोपीला
पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
सिकंदर हा सेन्ट्रीग काम करत होता तर पट्टेकरी त्याचकडे मजूर म्हणून काम करत असे.पट्टेकर दुसरीकडे कामास गेल्याने दोघा मध्ये बुधवारी रात्री मारहाण झाली होती. याच गोष्टीचा मनात राग धरून आज गुरुवार (ता.३) सकाळी साडे आठच्या सुमारास पट्टेकरीने शिकलगारवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचरादारम्यान दुपारी शिकलगारचा मृत्यू झाला. या पुढील अधिक तपास पोलिस करीत आहे