
कुपवाड, ता.४ : शहर व परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कुपवाड यांच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनामध्ये ह्या प्रमुख मागण्या आहेत. कुपवाड शहर व परिसरातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नशेखोरी, हुल्लडबाजी व चोऱ्यामाऱ्या, खून, तस्करी असे प्रकार वाढले आहेत.
परप्रांतियातील व्यक्तींच्यावर कोणाचेही वर्चस्व नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी. कुपवाड शहर व परिसरामधील रहिवाशी नागरीकांच्या जिवीतास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. कुपवाड शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयामध्ये अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण वाढू नये म्हणून आपल्या मार्फत प्रबोधनात्मक उपाययोजना करण्यात यावेत या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोतरे, युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण रुपनर, ओबीसी प्रदेश सरचिटणीस सागर माने, दादासाहेब कोळेकर, दाऊद मुजावर यांच्यासह पदाधिकारी आदी उपस्थीत होते.