
कुपवाड, ता.३: कुपवाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये कुपवाड व मिरज एमआयडीसी मधील उद्योजकांना येणारे अडचणी व त्रास याबाबत आज कृष्णा व्हॅली क्लब कॉन्फरस हॉलमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी मिरज उपअधिक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस उपअधिक्षक (गृह) तानाजी सावंत, स्था. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व कुपवाड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक दिपक भांडवलकर, प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, उपस्थित होते.
यावेळी उद्योजकांनी आपल्या समस्या मांडल्या यामध्ये परप्रांतीय कामगारांना रात्रीचे आडवून त्यांना मारहाण करणे त्यांचे पैसे लुबाडने दमदाटी करणे असे प्रकार होत आहे. नशेखोरांचे प्रमाण वाढले आहेत. बऱ्याच ठिकाणी पथदिवे नाहीत त्याचा फायदा घेत मारहाण, लुटमार व चोरी यासारख्या घटना घडत आहे. यासाठी गस्त घालण्याची मागणी करण्यात आली. एमआयडीसी मध्ये वाहतूक कोंडी व आपघात चे प्रमाण वाढले आहे. यासाठी कायमस्वरूपी मेनन पिस्टन व कुपवाड चौक येथे दोन ट्रॅफिक पोलीसांची नियक्ती करावी. मिरज एमआयडीसी मधील पोलीस चौकी पोलीस कर्मचारी यांच्या कमतरतेमुळे पूर्णकाळ चालू नसते ती पूर्णकाळ चालू करण्याची मागणी उद्योजकांकडून करण्यात आली.
सदर बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कुपवाड व मिरज एमआयडीसी उद्योजक यांना सूचित केले की, कुपवाड पोलीस ठाणे अंतर्गत डार्क स्पॉट ठरवुन त्या ठिकाणी पेट्रालिंग करीता हत्यारबंद अंमलदार गस्त नेमण्यात येणार तसेच उद्योजकांना त्रास देणारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या बाबतीत मोक्का कारवाई करणार असा कडक इशारा दिला.

उद्योजकांनी त्यांचे कंपनी अंतर्गत सीसीटीव्ही लावणेबाबत व त्यांचेकडे असणारे कामगार व परप्रांतिय कामगार यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करणेबाबत व बंद असणारे कंपनी मधील संशयास्पद होणा-या हालचाली बाबत तात्काळ संबंधीत पोलीस ठाणेस कळवावे अश्या सूचना दिल्या. उधोजक, ठेकेदार व ट्रान्सपोर्ट आणि कुपवाड पोलीस यांचा व्हाटसअप ग्रुप बनवून समनव्य साधावे. एमआयडीसी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी अवजड वाहनांना ४० वेग मर्यादा ठरवुण देणेबाबतच्या सुचना दिल्या. तसेच उद्योजक कामगार यांना मारहाण किंवा लुटमार व चोरी अश्या घटना घडत असतील तर तात्काळ पोलीस ठाणे तक्रार द्यावी. त्यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगतिले आहे.

सदर आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी केले. यावेळी उद्योजक विनोद पाटील, अशोक कोठावळे, चंद्रकांत पाटील, अजय पोतदार, अनंत चिमड, संजय गुंडपकर, प्रकाश माने, विनायक घुळी, सदाशिव मलगाण, अतुल पाटील, प्रशांत माळगे उपस्थित होते.