
मिरज, ता.३ : बेळंकी येथे लाच घेताना तलाठी व कोतवाल यांना रंगेहात पकडले.(ता.मिरज) कदमवाडी येथील एका युवकाने बेळंकी हद्दीतील बिगर शेती प्लॉट खरेदी केला होता त्या प्लॉटची नोंदणी करण्यासाठी बेळंकी येथील तलाठी सागर चव्हाण यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता, परंतु नोंदणी करण्यासाठी सदर युवकाला तलाठी यांनी अडीच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. युवकाने तलाठीस पैसे देण्याचा होकार दिला पण पैसे न देता लाच लुचपत विभागाशी संपर्क साधून बेळंकी येथील तलाठी प्लॉटच्या नोंदणीसाठी अडीच हजार रुपयाची लाच मागत असल्याची तक्रार दिली.
सदर माहिती मिळताच आज गुरुवार (ता.३) रोजी दुपारी लाच लुचपत अधिकारी यांनी तलाठी सागर चव्हाण व कोतवाल राजू वाघमारे अडीच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत अधिक चौकशी करिता दप्तरासह सांगलीला घेऊन गेले. तलाठी व कोतवाल यांना लाच घेताना पकडल्याची घटना वाऱ्यासारखी बेळंकी परिसरात पसरली व एकच खळबळ उडाली