
समडोळी, ता.२ : सांगलीत धक्कादायक घटनेने खळबळ उडाली. सांगलीतील समडोळी गावातील चांदोली वसाहतमध्ये मृत आवस्थेतील स्त्री जातीचे अर्भक आढळून आलेची घटना मंगळवारी (ता.१) रोजी रात्री उघडकीस आली.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती गावातील लोकांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास दिली. ही घटना समजताच घटनास्थळी सांगली ग्रामीणच्या सहा. पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे व पोलीसांनी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचा अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे करीत आहे.