मिरज विधानसभाक्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडेंना राष्ट्रवादीकडून मोठी संधी देणार – आ. इद्रिस नायकवडी


मिरज / प्रतिनिधी


मिरज, ता.२ : समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, हक्क, अधिकार मिळाला पाहिजे यासाठी महादेव दबडे प्रयत्नशील असतात. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक कृतिशील कार्यकर्ते आहेत. ते आमच्या पक्षाची मिरज विधानसभा क्षेत्राची धुरा सांभाळत आहेत याचा अभिमान आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार अशा कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय दिला जातो. नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महादेव दबडे यांना मोठी संधी देण्यात येईल, असे प्रतिपादन आ. इद्रिस नाईकवडी यांनी केले.

राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून, ग्रामीण व शहरी भागातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शेकडोंच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी दबडे यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन, अनेकांनी दूरध्वनीद्वारे, सोशल मीडिया वरून शुभेच्छा दिल्या. शहर आणि ग्रामीण भागात समर्थकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक मोठ्या संख्येने लावण्यात आले होते.

तुकारामबाबा महाराज यांच्याकडून लाडू तुला व राष्ट्रवादीचे आ. इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे याच्यां उपस्थितीत वही तुला करण्यात आली. शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान, अतहर नायकवडी, विष्णू माने, आकाश माने, शकंर गायकवाड, देवजी साळूंखे, हर्षल सावंत, बोलवाड उपसरपंच सचिन कांबळे, राधिका हारगे, वंदना चंदनशिवे, जुबेदा मुजावर, निता आवटी, बोलवाड सरपंच निगार शेख, टाकळी सरपंच हिना नदाफ, निलजी बामणी सरपंच विठ्ठल मलमे, मालगाव उपसरपंच तुषार खांडेकर, बामणी उपसरपंच सागर कोलप, सुलेमान मुजावर, पिंटू नाईक, चंद्रकांत मैगुरे, मनोज नाद्रेकर, मन्सूर नदाफ, रावसाहेब लोखंडे, रवि मोहीते, निपु परदेशी, ऑगस्ट कोरे, प्रविण राऊत यांच्यासह पदाधिकारी, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आ. नायकवडी यांच्या हस्ते महादेव दबडे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button