
महाराष्ट्र, ता.१ : “छत्र निजामपूर” नव्हे, आता “किल्ले रायगड ग्रामपंचायत” हवी! जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी स्थापन केली, तो रायगड किल्ला आज “छत्र निजामपूर ग्रामपंचायत” या नावाने ओळखला जातो, ही आपल्या अस्मितेची शोकांतिका आहे, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. आज मंगळवार (ता.१) रोजी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन “छत्र निजामपूर” हे नाव बदलून “किल्ले रायगड ग्रामपंचायत” असे करण्याची अधिकृत मागणी करणारे निवेदन आमदार पडळकरांनी सादर केले.
या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात रायगडवाडी, वाघेरी, हिरकणवाडी, नेवाळीवाडी, पेरूचादांड, आदिवासीवाडी यासह अनेक ऐतिहासिक वाड्यांचा समावेश आहे. छत्रपतींच्या राजधानीला तिचा गौरवशाली इतिहास सन्मान मिळावा. तर या मागणीव तातडीने निर्णय घ्यावा, अशी नम्र विनंती मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार पडळकरांनी केली.
