
मिरज, ता.१ : मिरज संस्थान चे राणीसाहेब कै.उमाराजे पटवर्धन महाराज यांच्या जयंतीनिमित्त वड्डी येथे अंगणवाडी व प्राथमिक शाळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कै उमाराजे पटवर्धन हे पुण्यामध्ये ब्युल बेलस या नावाने अंगणवाडी ५० वर्षे चालवत असे.
त्यांचीच एक आठवण म्हणून मिरज संस्थान चे राजेसाहेब श्रीमंत गंगाधरराव उर्फ बाळासाहेब पटवर्धन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज संस्थान चे युवराज श्रीमंत माधवराजे पटवर्धन महाराज यांनी नवीन प्रवेश घेणाऱ्या जिल्हा परिषद अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. त्यावेळी श्रीमंत माधवराव पटवर्धन शाळा समितीचे अध्यक्ष सागर नाईक, कल्लाप्पा नाईक, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य शंकर नाईक, प्रकाश नाईक, अशोक नाईक, युवराज नाईक, अंगणवाडी चे सेविका मदतनीस तसेच प्राथमिक चे शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.