
अमरावती, ता.१ : गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली. एका पोलीस अधिकाऱ्याचा दिवसाढवळ्या चाकूने भोसकून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. वलगाव पोलीस ठाण्यास सहा. पोलीस निरीक्षक पदी कार्यरत असणारे अब्दुल कलाम अब्दुल नभी (वय ५७ वय, रा. टीचर कॉलनी, अमरावती) यांचा खून करणयात आला. अज्ञात आरोपीने आधी गाडीने धडक दिली नंतर चाकूने चौदा ते पंधरा वार करत भोसखून खून केला. ही घटना शनिवारी (ता.२८) रोजी गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या क्षेत्रात येणाऱ्या नवसारी टी पॉईंट नजीक घडली. या घटनेची पोलिसात नोंद झाली. घटना समजताच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण माहिती घेतली व तात्काळ अज्ञात आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अब्दुल कलाम अब्दुल नभी वलगाव पोलीस स्टेशनमध्ये सहा. पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. शनिवारी (ता.२८) रोजी ते घरातून ते पोलीस स्टेशनला जात असतानाच अज्ञात वाहनाकडून त्यांचा पाठलाग करत त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर सहा ते साथ अज्ञात्यांनी कलाम यांच्यावर चाकूने भोसकून खून केल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक आर्थिक वादातून झाला आसल्याचे समजते. या पुढील अधिक तपास गाडगेनगर पोलीस करीत आहे.