
सांगली, ता.३० : सामाजिक सेवेत उल्लेखनीय कार्यकरणाऱ्या अमृता शेडबाळकर यांना गुरुवार (ता.२६) रोजी राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेतर्फे पुण्यात राज्यस्तरीय ‘आदर्श आरोग्य सेवा समाजरत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. अमृता शेडबाळकर ह्या गेल्या अनेक वर्षांपासून सांगली शासकीय रुग्णालयात कार्यरत असून त्या समाज हितासाठी सातत्याने कार्य करत आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेतर्फे पुण्यात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रभक्ती परिवार आपला सन्मान करत आहे,” अशा शब्दात संघटनेने त्यांचा गौरव केला. पुरस्कारामुळे त्यांच्या कार्यास नवसंजीवनी मिळाली असून, विविध क्षेत्रातून त्यांचा गौरव करण्यात येत आहे.