
आरग, ता.३० : येथील बेपत्ता असलेल्या २१ वर्षीय तरुणाचा तलावात बुडवून खून. सदर घटना रविवारी (ता.२९) उघडकीस आली. सुजल बाजीराव पाटील वय २१ वर्ष, रा. आरग असे मृत तरुणाचे नाव आहे. हा खून त्याचेच दोन अल्पवयीन मित्रांनी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. समलिंगी करण्यास सुजलने नकार दिल्याने मारहाण करत तलावात बुडवून सुजलचा खून करण्यात आला. याबाबत दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुजल बाजीराव पाटील हा तरुण (ता.२८) रोजी आपल्या मित्रासोबत बेळंकी येथे हळदीच्या कार्यक्रमास गेला होता पण घरी परत आलाच नाही. सुजल घरी परत न आल्याने सुजलचे मामा यांनी गावात सुजलची शोधाशोध केली पण सुजलचा काही थांगपत्ता लागला नाही. रविवार (ता.२९) रोजी सुजलचे मामा यांनी मिरज ग्रामीण पोलीसांत सुजल बेपत्ता असल्याची तक्रार केली. सुजल त्याचा मित्रासोबत गेल्याचे नातेवाईकांनी पाहिले असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सुजलच्या मित्रांना बोलवून सुजल बाबत विचारपूस केली असता, सुजल व त्याचे दोन मित्र हळदीच्या कार्यक्रमास बेळंकीला गेले होते.त्यावेळी त्यांनी मधपान केले होते. कार्यक्रमानंतर आरग येथे आले.
सुजलच्या एका अल्पवयीन मुलाने सुजलवर समलिंगी करण्याचा प्रयत्न केला. सुजलने समलिंगी करण्यास विरोध केल्याने दोघा अल्पवयीन मुलांनी सुजलला लाथाबुक्यांनी मारहाण करत आरग मधील तलावात बुडवून खून केला आसल्याचे सांगितले. तात्काळ घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद व ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. घटनेची पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह शेवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. ही कारवाई मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी केली. दोघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यापुढील अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहे.