
कुपवाड, ता.२८ : २१ वर्षीय तरुणाचा खून करून पसार झालेल्या दोन संशितांच्या अवघ्या काही तासातच पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सांगली एलसीबी आणि कुपवाड पोलीसांनी ही संयुक्त कारवाई केली. साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी, वय २४ वर्षे, रा. मुळ बुलढाणा, सद्या रा. बामणोली कुपवाड, सोन्या उर्फ अथर्व किशोर शिंदे, वय २० वर्षे, रा. बामणोली कुपवाड असे अटक केलेल्या दोघा संशितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुपवाड औधोगिक वसाहतीत महावितरणच्या पाठीमागील बाजूस शुक्रवार (ता.२७) रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास नटराज कंपनीजवळ अज्ञात्यांनी उमेश पाटील याचा हत्याराने डोक्यात वार करून निर्घृण खून केला व पसार झाले. या घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हयाचे गांभीर्य ओळखून सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देवून स्थानिक गुन्हे शाखेस आणि कुपवाड पोलीसास सदर गुन्ह्याचा छडा लावून आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले होते. दिलेल्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/ सतिश शिंदे व त्यांच्या शाखेकडील सपोनि/ पंकज पवार व स्टाफ आणि कुपवाड पोलीस ठाणेचे सपोनि / दिपक भांडवलकर, पोउपनि. विश्वजीत गाढवे व स्टाफ अशी दोन पथके अज्ञात आरोपींचा शोधासाठी रवाना झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/ पंकज पवार यांचे पथकामधील सतिश माने व सागर लवटे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, उमेश पाटीलला मारणारा साहिल उर्फ सुमित खिलारी कुपवाडमधील फॉरेस्ट ऑफीस रोडवरील यश सर्व्हिसींग सेंटर जवळ थांबलेला आहे. नमुद पथक नमूद ठिकाणी सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्याला त्याचे नाव गाव विचारून त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी असून त्यांचा मित्र सोन्या उर्फ अथर्व शिंदे आणि एक अल्पवयीन यांनी मिळून हा खून केले असल्याचे सांगितले. खुनाचे कारण विचारले असता उमेश पाटील यांचा प्रेम प्रकरणातुन वाद झाल्याने डोक्यात लॉखडी रॉड घालून खून केल्याची कबुली दिली. सपोनि पंकज पवार यांनी आरोपीना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी कुपवाड पाोलीसांच्या स्वाधीन केले.
कुपवाड एम.आय.डी. सी कारवाई
कुपवाड पोलीस ठाणेचे पोउपनि. विश्वजीत गाढवे यांचे पथकातील संदीप पाटील यांना गोपनिय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सोन्या उर्फ अथर्व शिंदे हा कवलापुर येथील विमानतळ येथे थांबला आहे. नमूद ठिकाणी पथकांने सोन्या उर्फ अथर्व शिंदे ताब्यात घेतले व सदर गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता, वरील कारणासाठी उमेश पाटील याचा खुन केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयाचा पुढील तपास कुपवाड एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याचे सपोनि/ दीपक भांडवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुपवाड पोलीस करीत आहेत.