
कुपवाड, ता.२८ : औधोगिक वसाहतीत महावितरणच्या पाठीमागील बाजूस एका २१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला. सदर घटना शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. उमेश मच्छिंद्र पाटील, वय २१ वर्ष, रा. श्रीनगर मशिदजवळ कुपवाड असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मृत उमेशच्या भाऊ महेश मच्छिंद्र पाटील यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास कुपवाड औधोगिक वसाहतील महावितरणच्या पाठीमागील बाजूस उमेशच्या डोक्यात अज्ञात्यांनी धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी करून त्याचा निर्घृण खुन केला. घटनास्थळी पोलिस धाव घेत मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. संशयितांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले. या घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली. यापुढील अधिक तपास सपोनि दीपक भांडवलकर करीत आहे.