
सांगली, ता.२७ : भारतीय जनता पार्टीने आमचे घर फोडले असा आरोप खासदार विशाल पाटील केला. यावर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विशाल पाटील यांनी केलेले आरोप खोटे असून त्यात काय तथ्य नाही. आम्ही कोणाचे घर फोडले नाही. विशाल पाटील म्हणतात की भाजपने आमचे घर फोडले. आम्ही घर फोडायला जयश्री वाहिनी ह्या काय वयाने लहान नाहीत कोणीतरी चुकीचे मार्गदर्शन केले. त्यांनी खूप दिवस विचारवंत कार्यकर्त्यांची बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. पुढे बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विशाल पाटील यांचा काय दावा आहेका ते भाविष्यात येणार नाहीत ? मग त्या वेळस काय म्हणायचे राजकारणात काय कोणाचे सांगता येत नाही.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, घर फोडले असे म्हणत असताना त्यानां असे म्हणायचे आहे कि, जयश्रीवहिनींना काही कळत नाही त्या भाजपचा प्रभावाखाली आहेत पण तसे काहीच नाही. काँग्रेसने त्यांना पक्षातून काढले. बाकीच्या ठिकाणी पक्षातून काढले तर निवडणुकीनंतर एका महिन्यात पक्षात घेतात. विधनसभेला त्याचा क्लेम होता डाववला. पुढे बोलताना ते म्हणाले जयश्री वहिनींचा असा मुद्दा आहे काँग्रेस ने आम्हाला काय दिले. पूर्वी दिले ते जग जाहीर आहे. वसंतदादाच या घरामध्ये होते. पण आता काय दिले. मदन भाऊंच्यानंतर गट घेऊन मार्गक्रमण कशी करू जर ह्यांनाच तुम्ही काही देत नसाल पक्षातून बाहेर काढत असाल तर काय असे ते म्हणाले.
सर्वसामान्य माणसांना माहित आहे कि, विशाल पाटील यांचा लोकसभेला कसा विजय झाला, हे काय मी जाहीर पणे सांगू शकत नाही. ती एक लॉटरी होती, मग मागच्या वेळेस पण ते यायले पाहिजे होते. प्रत्येक वेळी परिस्थिती वेगळी असते ती बदलते यावेळी ती बदलली ती विशाल पाटील यांच्याकडे गेली. जवळजवळ गेल्या काही दिवसांपासून विशाल पाटलांचे असे चालू आहे कि मि अपक्ष निवडून आले म्हणजे मी काय राजा झालो. सगळ्या विषयावरती मार्गदर्शन करायला मोकळे झाले. प्रत्येक विषयावर ते ठिपन्नी करतात म्हणजे ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे ते म्हणतात की आम्ही घर फोडले पण त्यात काय तत्य नाही, आम्ही काही घर फोडले नाही हे खोटे आरोप आहेत.