
सांगली, ता. २७ : बुधगावात गर्दीत धक्का लागल्याच्या शुल्लक कारणातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. बुधगाव येथे बनशंकरी देवीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवात ही घटना घडली. या घटनेत विश्वजित सुनील बिराजदार (१७, रा. श्रीरामनगर, बुधगाव) हा महाविद्यालयीन तरुण जखमी झाला. पोलिसांनी संशयित तिघांसह दोन अल्पवयीन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधगाव येथे बनशंकरी देवीचा उत्सव सुरू असल्याने गर्दी आहे. काल रात्री या गर्दीत संशयित अभिषेक याच्या भावाला विश्वजित याचा धक्का लागलेच्या शुल्लक कारणातून दोघांच्या वाद सुरू झाला. त्याठिकाणी वाद संपुष्टात आला. त्यानंतर विश्वजितला वाद मिटवण्यासाठी कन्या महाविद्यालयाजवळ बोलावले. त्यावेळी अभिषेकचा मित्राने शिवीगाळ करत विश्वजित याच्या हातावर कोयत्याने वार केला. पुन्हा नाद केला तर सोडणार नाही, अशी चेतावणी दिली. घटनेनंतर विश्वजितने उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. विश्वजितने संशयितांविरोधात तक्रार दिली. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा नोंद केला.