
शक्तीपीठ महामार्गासंदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या भुमिकेनंतर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक पार पडली.
या बैठकीला माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील,खासदार विशाल पाटील,आमदार विश्वजीत कदम,आमदार कैलास पाटील,माजी खासदार राजू शेट्टी तसेच शिवसेनेचे विजयराव देवणे,कॉ.गिरीश फोंडे यांच्यासह १२ जिल्ह्यातील अनेक बाधित शेतकरी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये ही लढाई रस्त्यावरची असून ती रस्त्यावरच लढली पाहीजे असा ठराव करण्यात आला. कृषीदिनी म्हणजेच मंगळवार दि.१ जुलै रोजी १२ जिल्ह्यात ‘महामार्ग रोको आंदोलन’ करण्यात येणार आहे असे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी जाहीर केले आहेत.