
सांगली, ता.२६ : महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. हा खून संजयनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला आहे. मृत महिलेचे नाव शीलवंती पिंटू पाटील, वय ३० वर्ष असे आहे. हा खून तिचा पतीने केला असल्याचे माहिती समोर येत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, संजयनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक स्त्री जातीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती संजयनगर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. सदर आढळून आलेल्या मृतदेह्याबाबत खूनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव शीलवंती पिंटू पाटील, वय ३० वर्ष असे आहे. हा खून तिचा पतीने केला असावा अशी माहिती समोर येत आहे. या घटनेचा अधिक तपास संजयनगर पोलीस करीत आहे.